Tuesday, April 19, 2011

चांद रात


चांद रात
चंद्र तुझ्या डोळ्यात पाहिला मी
तारकांची रोषणाई होती,
रात्र तुझ्या केसात माळली मी
तांबड्याची आस नव्हती.

स्पर्श माझा नवखा न तुला
डोळे तरीही तू मीटली होती,
तू मला अन् मी तुला
भेटण्याची रात्र होती...

तांबड्याची आस नव्हती.

                                        - देसाई अभिजीत




2 comments:

  1. लई भारी... अजून मोठी लिहायची होतीस की. आवडली :)

    ReplyDelete