Sunday, April 24, 2011

राग तुझा

राग तुझा

राग नको धरू सखे मज् वरी
होते काळजाची लाही लाही,
द्वेष माझा का ग तुला
तुजवाचून  शब्दान्स या अर्थ नाही.

वागतो कधी खूळा
वाटतो तुला कधी मूर्खही,
कल्पना आहे मला
सवय माझी विचित्र ही.

मनापासून विचारशील
तर कारण वेडाचे सांगीनही,
तुझ्या प्रेमानेच केलय मला
खूळा आणि स्वार्थीही.

मोहक चेहरा.. सुबक बांधणी
तुझे दिवाणे अनेक असतीलही,
रुद्र डोळ्यांनीच तुझ्या
लावलय  वेड मला ह्या आधीही.

                                    - देसाई अभिजीत.




Tuesday, April 19, 2011

चांद रात


चांद रात
चंद्र तुझ्या डोळ्यात पाहिला मी
तारकांची रोषणाई होती,
रात्र तुझ्या केसात माळली मी
तांबड्याची आस नव्हती.

स्पर्श माझा नवखा न तुला
डोळे तरीही तू मीटली होती,
तू मला अन् मी तुला
भेटण्याची रात्र होती...

तांबड्याची आस नव्हती.

                                        - देसाई अभिजीत