गेले ३-४ आठवडे माझ्या स्टुडिओ मधे अमेरिकेहून क्लाइंट्स आले होते. दोघेच होते. आम्ही सध्या काम करत असलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक आणि दुसरी निर्माती. नाव गाव सांगू शकत नाही ( सिनेमाचे ही आणि त्या दोघांचेही ) एन. डी. ए. साइन केले आहे ना काय करणार. :) उगाचच माझी पंचाईत नको व्हायला.
आमच्या स्टुडिओ मधे तसे बरेच आणि बर्याच ठिकाणहून क्लाइंट्स येतात. आणि ते येणार म्हणून स्टुडिओ जरा नेहमी पेक्षा वेगळाच दिसतो. तसा आमचा स्टुडिओ ( म्हणजे आमची काम करण्याची जागा ) हा इतर सर्व वर्कप्लेसेस पेक्षा अगदी फुल्लोन आहे हां. अगदी कोणालाही हेवा वाटावा अशी. ;) सर्व ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची खेळणी, भिंतींवर मूवीस चे पोस्टर, पेंटिंग्स, आकर्षक डेस्क्स आणि इनडाइरेक्ट लाइटिंग म्हणतात तशी मस्त लाइट सेटप.
माफ करा बरेच बोललो.... तर मुदयावर येतो की... क्लाइंट्स येणार म्हणून बरेच काही बदल घडतात स्टुडिओ मधे.. कॅंटीन मधील प्रत्येक टेबलवर विदेशी फुलांचे फ्लवरपॉट्स येतात, ए सी जरा जास्तच चिल्ड होतात, दारात मस्त रांगोळी काढली जाते, संपूर्ण फेसिलिटीस डिपार्टमेंट धावपळ करत असत.
मी म्हणेन एका दृष्टीने बघितला तर हे सर्व ठीक आहे, म्हणजे मला यात तस वाईट असे काही वाटत नाही. पण... "उद्या आपल्याकडे क्लाइंट्स येणार आहे म्हणून सर्वानी स्टुडिओत नीट वागावे, सर्वानी चांगला पोशाख घालावा, सकाळचा नाश्ता ९ वाजेपर्यंतच मिळेल, सर्व आर्टिस्ट ९.१५ पर्यंत डेस्क वर काम करण्यास आले पाहिजेत," अश्या सूचनांचा मेल क्लाइंट्स येण्या आधी तुमच्या ऑफीस मधे सुद्धा येत असेल तर मी समजेन.. आमच्यासोबत आणखी कोणीतरी आहे. चला... हे सुद्धा कसेतरि मान्य केले ( फ्रँकली स्पीकिंग मला मान्य नाही ) कारण क्लाइंट हा शेवटी आपल्याकडे काम आणे त्या ओघाने पैसा घेऊन आलेला असतो. पण... पण हे प्रकर्षाने होत जेंव्हा "गोरे" पाहुणे येतात. गेल्या ३-४ वर्षात मी कधीच पाहिले नाही की उद्या कोणी भारतीय चित्रपट श्रष्टीमधला दिगर्शक, निर्माता येत आहे आणि यातली एकतरी गोष्ट घडली आहे... छे.. मला आठवतही नाही.
अहो ईतकेच काय... भारताबाहेरून येणार्या क्लाइंटमुळे कॅंटीन मधे चक्क अंड्याच्या गोष्टी बनत नाहीत, का तर त्याचा वास पसरेल सगळीकडे. आता मला सांगा जगातला कोणता माणूस अन्ड खात नाही. गोरयांचा तर ब्रेड ओम्लेट हा आवडता नाश्ता असावा. त्यानी असा वास आल्यावर प्रॉजेक्ट काढून घेतला असता की काय !!!
आता जर तुम्ही म्हणाल की तो शेवटी क्लाइंट आहे त्याची काळजी घेतली पाहिजे... पण मग मला सांगा आपल्या देशातून, देशातून काय आमच्या मुंबईतुन एखादा क्लाइंट येत असेल तर त्याची काळजी का घेऊ नये आपण, तो सुद्धा प्रॉजेक्ट आणतो, काम झाल्यावर त्याचा मोबदलाही देतो.. यावर ए सी जास्त चिल्ड करण सोडाच, पण "हा" क्लाइंट आलेला काळातही नाही.
देशाबाहेरून आलेल्या वाकतीचे आदरतिथ्य करण्यापर्यंत ठीक आहे... पण एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणहून आलेल्या वक्तींच्या "आदरतिथ्यात" एवढी तफावत असणे खरच बरोबर आहे का.... का आपण अजूनही अप्रत्यक्ष्यरित्या त्यांना...गोरयांना आपला राजा मानतो.
मी भारतातील पहिल्या ३ पोस्ट प्रोडक्षन स्टुडिओ पैकी एक अश्या स्टुडिओत काम करतो आणि वरील संदर्भात मला माझ्या स्टुडिओबद्दल नाही तर इथे रूढ झालेल्या ( या रूढींचे मूळ मला माहीत नाही ) गोष्टींबद्दल वाईट वाटते. मला हे ही माहीत नाही की तुमच्यापैकी किती जणांसाठी हे नवीन आहे की तुम्हिसुद्धा हे कुठेतरी केंव्हा तरी अनुभवले आहे.
गेले ३-४ आठवडे आमच्याबरोबर असलेले क्लाइंट्स, गेल्या शुक्रवारीच पून्हा आपल्या देशी परत गेले. आणि ते असताना "जरा जास्त" चिल्ड केलेला ए सी आज पुन्हा कमी झाला आणि ह्या सर्व गोष्टी मनात गरम झाल्या.

देसाई अभिजित
हे हे ...आम्हाला हे रोजच झालय..
ReplyDeleteक्लाइंट दर दिवसांनी येतो. गोष्टी मनात गरम होतात, पण आपण काही करू शकत नाही रे. हे चित्र सगळीकडेच आहे...
काय म्हणतोस...
ReplyDeleteमित्रा सगळ्या Industry मध्ये हेच आहे रे .....
ReplyDeleteआम्हा IT वाल्या मध्ये पण हीच प्रथा आहे .....