Sunday, February 20, 2011

पहिले पान....

                    काल रात्री १ च्या सुमारास  ब्लॉग कार्यरत (active) केला. खरे सांगायचे तर १-२ वर्षांपूर्वीच blog-spot वर लॉगीन केले होते. पण ते असच... प्रत्येक वेळी वाटायचे आपणही काही तरी लिहूया, काहीतरी लिहूया पण छे... कधी जमलेच नाही. कारण त्या वेळी मी विचार करत असे लिखाण करणे म्हणजे  एकदम प्रोफेशनल असलेच पाहिजे, मग विचार सुरु झाले असे लिहितो तसे लिहितो , ह्या विषयावर लिहू कि त्या ... मला जमेल ना, कि पचका होईल वगैरे वगैरे. विचार करून करून काहीच सुचेना, दिवस लोटले, महिने गेले... आणि मग कधी हा ब्लॉग लिहिण्याचा किडा माझ्या मनातून पुसला गेला ते कळलेच नाही.

                 काही महिन्यांपूर्वी इंटरनेट वर सर्फ करताना एक ब्लॉग डोळ्यासमोर  आला, तो मी वाचला देखील... नंतर वेळ मिळाला तेंव्हा त्या ब्लॉगरचेच २-३ ब्लॉग्स वाचले,  आणि कधी काळी डोक्यातून गायब झालेला  तो "लिहिण्याचा" किडा कधी पुन्हा डोक्यात घर करून गेला काळेच नाही. अक्चुअली  गोष्ट  जरा वेगळी होती. ह्या वेळी मी विचार केला ... एकतर मी लिखाणात प्रोफेशनल नाही, माझा तो गुणधर्मच नाही, किंवा मला यात काही करियर सुद्धा करायचे नाही .... पण मला लिहायचे आहे. मग अगदी day today life मध्ये जे माझ्या समोर घडते, जे माझ्या मनात विचार येतात, जे मी घरी, मित्रांबरोबर share करतो.. (कधी करतही नाही ) त्याच गोष्टी का इथे लिहू नये.... मग ते कसही का असेना माझी एक लिहिण्याची इच्छा तरी पूर्ण होईल. आणि मग ठरवले.. चला सुरुवात तर करूया.... मनातले शब्दात मांडून  ह्या ई-कागदावर आणूया... म्हणूनच हा ब्लॉग  "मन टि. व्ही."

आज रविवार, दिवसभर नुसता आणि नुसता टाइम पास  केला. संध्याकाळी बायकोने कॉफी करून दिली, पिताच होतो, म्हटलं... चला हा मन टि. व्ही. चालू तर करूया... बघू किती दिवस चालू राहतो ते. :)


कॉफी थंड झाली बहुतेक .... गरम करून आणतो.  


3 comments:

  1. वाह...अप्रतिम :)
    लिहते रहा..शुभेच्छा
    ब्लॉगवर फीडबर्नरच विजेट लाव म्हणजे आम्हाला पोस्ट ईमेलमध्ये आणि गूगल रीडरमध्ये घेता येईल.

    - सुझे

    ReplyDelete
  2. या 19 जिल्ह्यात नवीन कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा उपलब्ध येथे करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन
    पहा कसे करावे आपल्या मोबाईलवर
    👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼🌿🌿🌿
    Dofollow--https://www.shetkarinews.com/
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

    ReplyDelete